प्रतिनिधी, औरंगाबाद : आज बुधवार सहा जुलै रोजी औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील चित्रपट महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर आज चित्रपट महामंडळाच्या आठ जिल्ह्यातील सदस्यांनी चित्रपट महामंडळाची निवडणूक घेण्याच्या मागणीसाठी मूक आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी चित्रपट महामंडळाचे विविध जिल्ह्याचे सदस्य एकत्रितपणे जमा झाले होते गेल्या आठ वर्षापासून चित्रपट महामंडळाची निवडणूक झाली नसून सदरील निवडणूक घेण्यात यावी या मागणीसाठी आज रोजी मुका आंदोलन करण्यात आले आहे. सदरील आंदोलनाच्या दरम्यान चित्रपट महामंडळाचे सदस्य जॉन भालेराव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कोल्हापूर येथील धर्मदाय आयुक्त यांनी आठ वर्षापासून सदरील चित्रपट महामंडळाची निवडणूक का घेतली नाही त्यांनी कारण स्पष्ट करावे आणि सदरील निवडणूक लवकरात लवकर लावण्यात यावी अशी मागणी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांकडून आज रोजी करण्यात आली आहे.मागणी मान्य न झाल्यास ती आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आज रोजी देण्यात आला आहे.
