प्रथिनिधी, मुंबई :
शिमला येथे 27 ते 29 मे रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत शिक्षण क्षेत्रात राज्य सरकारांनी विद्यापीठ प्रशासनातील अनिष्ठ हस्तक्षेप थांबवावा, सध्याचे राष्ट्रीय परिस्थिती, विद्यार्थी केंद्रित आणि भविष्याभिमुख राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, स्वावलंबी भारत बनवण्याच्या दिशेने तरुणांनी वाटचाल करावी, असे चार प्रस्ताव पारित करण्यात आले.
अभाविपचे येत्या 9 जुलै पासून अमृत महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्ताने 1 कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प अभाविपने केला आहे. त्याचसोबत 1 कोटी सदस्यसंख्येचे उद्दिष्ट अभाविपने निश्चित केले आहे आणि 2 लाख गावांमध्ये एक गाव, एक तिरंगा मोहीम राबवण्यात येणार असल्याचे आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
