जनतेज न्युज

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने मनिषा वाल्मिकी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीकरिता

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने मनिषा वाल्मिकी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

प्रतिनिधी , पुणे : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने उत्तर प्रदेश मधील वाल्मिकी समाजातील मनिषा वाल्मिकी यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले . यावेळी निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिले .
मनिषा वाल्मिकीवर चार सुवर्ण ठाकूर यांनी गॅंगरेप करून तिची जीभ कापण्यात आली . तिच्या शरीरावर अत्याचार करण्यात आला . तिच्यावर वैद्यकीय उपचार व्यवस्थित करण्यात आले नाही . त्यातच तिचा मृत्यू झाला . पुरावे नष्ट करण्याकरिता तिच्यावर मध्यरात्री अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यामुळे संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी . अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुधाकरन पणीकर यांनी केली . अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांच्या नेर्तृत्वाखाली देशव्यापी तीव्र आंदोलन करण्यात आले .
या आंदोलनात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गुलाब चव्हाण , दीपक निनारिया , रेखा राजे , एम डी वाघमारे , ऍड सुशील मंचरकर , नगरसेविका गीता मंचरकर , गणेश भोसले , राजेश सरशा , प्रविण पिवाल , दमयंती आहेर , किशन चावरिया , महेंद्र लालबिगे , अजय रामानंदी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते