प्रतिनिधी, नागपूर : उन्हाळा मध्ये शहरात आगीच्या घटना वाढतात. नागपुरात मोठ्या मोठ्या इमारती मध्ये आगेला आटोक्यात आणण्यासाठी उंच वर पर्यंत पाहुचता यावं या करिता अग्निशमन विभागासाठी नागपुर महापालिकानी ३२ मी. हाइड्रॉलिक प्लेटफार्म खरेदी केलेले आहे. याची किंमत ८ कोटी पेक्षा जास्त आहे. नागपूर शहरात अनेक उंच इमारती आहेत. अशा इमारतींना विभागातर्फे अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत असते. अशा वेळेस विभागाकडे उंच इमारतीतील अग्निशमन व विमोचन कार्य करण्यास यंत्र सामुग्री असणे आवश्यक आहे. सध्या विभागात फक्त एकच ४२ मीटर उंचीचे टर्न टेबल लँडर कार्यरत आहे. शहरात अरुंद रस्त्यातील अनेक उंच इमारती अस्तित्वात आहेत. अशा इमारतींचे दुर्घटनांवर छोटया आकाराचे हाइड्रॉलिक प्लेटफार्म विभागाकडे आवश्यक होते. याकरीता विभागाने ३२ मी. हँड्रॉलिक प्लेटफॉर्म खरेदी केलेले आहे.३२ मी. हॅड्रॉलिक प्लेटफॉर्म अग्निशमन सेवेत रूजू झाल्याने शहरातील नागरीकांच्या अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फार उपयुक्त ठरणार आहे.
