प्रतिनिधी , पुणे : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरांनी उच्चांक गाठला आहे. पुण्यातील करुग्णांची वाढती संख्या पाहता उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काहीही करा, पुणे सील करा पण कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणा अशा सुचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानंतर आता पुणे पूर्णपणे सील करण्यात आले आहे.
पुणे शहर 27 एप्रिलपर्यंत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढचे आठ दिवस पुण्यात पू्र्ण संचारबंदी लागू असणार आहे. या संचारबंदीच्या काळात कुणी बाहेर आढळलं तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी देण्यात आले आहे.
पुढील आठ दिवस संपूर्ण संचारबंदी लागू असल्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील दुकानेही फक्त 2 तास खुली राहणार आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 100 टक्के संचारबंदीचा निर्णय घेतला आहे.
