जनतेज न्युज

अज्ञान रोगाने कोंबड्या दगावल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण

प्रतिनिधी , लातूर : लातूर जिल्ह्यातल्या केंद्रेवाडी इथं अज्ञात आजाराने जवळपास 400 कोंबड्या दगावल्या आहेत , या कोंबड्या नेमक्या कोणत्या आजाराने दगावल्या याचं निदान लागत नसल्याने ,जिल्हा प्रशासनाने केंद्रेवाडी पासून दहा किलो मीटरच्या त्रिजेमधील अंतरात अलर्ट झोन जाहीर केला आहे . दगावलेल्या कोंबड्याना जेसीबीच्या सहाय्याने खड्डा करून दफन करण्यात आले आहे . केंद्रेवाडी इथं सदाशिव केंद्रे यांनी नव्याने पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरु केला होता . त्यासाठी त्यांनी ८०० कोंबड्यांची पिल्लं अहमदनगर येथून आणली होती . दोन महिन्यांपासून ते या कोंबड्यांचा सांभाळ करीत होते . मात्र काल पासून अचानक कोंबड्या अशक्त होऊन जमिनीवर पडू लागल्या आहेत , बघता बघता काल आणि आज साधारण 400 कोंबड्या दगावल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आदेश जारी करुन लोकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. कोंबड्याच्या मृत्यूचे निदान लावण्यासाठी कोंबड्याचे स्याम्पल पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहे. तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन या पोल्ट्रीफार्मला भेट दिली आहे. निमोनिया सारख्या आजाराने या कोंबड्या दगवल्या असण्याची शक्यता प्राथमिकरित्या व्यक्त करण्यात येत आहे.