प्रतिनिधी , नायगाव : किनवट आदिवासी तालुक्यातील जलधरा येथील किसन हानवते यांनी गावोगावी भटकंती करून मोडक्या तोडक्या सायकलवर भाजीपाला विकायचा तर बेबीताई किसन हानवते ह्या विळ्याच्या आणीवर दुसऱ्यांच्या शेतात निंदणी खुरपणी करून मिळालेल्या पैशातून आपल्या संसाराचा गाडा हाकायच्या तर कधी उपाशी पोटी राहुन दिवस काढायचे अशी परिस्थिती असताना मरीबा हानवते हा विद्यार्थी त्याच्या वडीलाला भाजीपाला विकण्यात मद्दत करत असे अशी हालाखीची परिस्थीती असताना देखील मरीबा किसन हानवतेनी रात्रंदिवस अभ्यास करून नीट परिक्षेत 720 गुणापैकी 450 गुण मिळविल्याने एमबीबीएस साठी पात्र ठरला आहे.मरीबा किसन हानवते आठराविश्व दारीद्र घेवून मुलांना हिमतीची दाद देत सुनबाईला व मुलाला आणि नातवांना सतत मायेचा आधार देणाऱ्या मरीबा हानवतेच्या आजीने देखील नातवाच कौतूक करून माझा नातू आता देवाच्या कृपेने डॉक्टर झाला आहे. तर मरीबा हानवतेच्या आईने हालाकीच्या परिस्थितीची जाणीव देत गरीबी विषयी खंत व्यक्त करत आम्ही मुलाला शिकवल माझ्या मुलांनी माझ्या व माझ्या पतीच्या मेहनतीच चिज केल अस त्या सांगायला विसरल्या नाहीत.
