प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना अध्यक्ष पदावरून हटवल्याच्या निषेधार्थ आज जालन्यात मराठा महासंघाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.पाटील यांना अध्यक्ष पदावरून हटवल्याच्या निषेधार्थ मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शासन निंर्णय जाळून त्याची होळी केली.शहरातील गांधीचमन चौकात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत पुन्हा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी केली.
