प्रतिनिधी, बुलडाणा : भूमीहिनांसाठी अन्यायकारक असलेला महसूल वनविभागाचा जुलै 12, 2011 चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा. 2011 पर्यंत शेती प्रयोजनासाठीचे अतिक्रमणे कायम करण्यासाठी नव्याने शासन निर्णय जाहीर करावे.. वन हक्क कायद्याप्रमाणे दाव्यांची योग्य पडताळणी करून वनधारकांना वनपट्टे देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमी मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्रपाल वाघमारे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नितीन गवई, शेषराव चव्हाण,सुनील मिसाळ,रामेश्वर चव्हाण, दिलीप वाघ, गुलाबराव मोरे इत्यादी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
