प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला,
त्यामुळं शेतकऱ्यांची ऐन काढणीला आलेली खरीप आणि रब्बीची पीक मातीमोल झाली,
अद्याप राज्य शासनाची पुरेशी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये असं शेतकरी म्हणतं आहेत,
त्यात आजपासून केंद्रीय पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यात दाखल झालं आहे.
आज लांबोटी,कोळगाव पेनूर या ठिकाणी पाहणी करून हे पथक पुढे पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना होणार आहे.
केंद्रीय पथकासोबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ही उपस्थित आहेत.
एकूणच सर्व परिस्थिती पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मात्र केंद्र आणि राज्य सरकार बाबत नाराजी असल्याच चित्र सध्या पहायला मिळतं आहे.
