प्रतिनिधी , जालना : जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यातील खरिपाचे पीक अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले होते यामुळे शेतकरी पूर्ण खचून गेला होता कारण हातातोंडाशी आलेला घास या परतीच्या पावसाने हिसकावून घेतला होता व याच मुळे सरकारने अतिवृष्टी ग्रस्त भागातील नुस्कान पाहणी चालू केली होते आणि सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर राज्य सरकारने हेक्टरी दहा हजार रुपये मदत जाहीर केली होती तशी तरतूद करून जिल्हा बँकेला निधी देण्यात आला. आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत वाटपाला सुरुवात जाईल तर चित्र वेगळे समोर आले कारण शेतकऱ्यांना हजार दोन हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा या सरकारने लावण्याची समोर आले आहे.
