जनतेज न्युज

अनिल गोटे पडले तोंडाशी; अनिल गोटे डरपोक माणूस, भाजपा नेते नारायण पाटील यांची प्रतिक्रिया.

प्रतिनिधी , धुळे : जयकुमार रावल यांच्या तापी काठावरील फार्म हाऊस मध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी आमदार अनिल गोटे हे स्वता काल दुपारी दोंडाईचा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. धुळ्यातून काही मोजक्या कार्यकर्या सोबत दोंडाईचा पोलीस ठाण्याबाहेर पोहचल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांना पोलिसांनी बोललेच नाही तर तुम्ही का आले, आम्ही बोलावू तेव्हा तुम्हाला यावा लागेल असे सांगत पोलिसांनी त्यांना माघारी पाठवले.
अनिल गोटे दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी माजी आमदार अनिल गोटे यांचा निषेध करत, यावेळी भाजपाच्या समर्थकांनी अनिल गोटे यांच्या पोस्टरवर जोडे मारले. यानंतर भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले की, अनिल गोटे हे नेहमी पोलिस अधिकारी यांच्यावर दडपण निर्माण करतात, चांगल्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणं, सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार करण्याचे काम अनिल गोटे नेहमी करीत असतात. अनिल गोटे यांनी केलेल्या आव्हानाला जिल्ह्यातील कुठल्याही काँग्रेस असेल शिवसेना, किंवा त्यांच्या स्वतच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समर्थन दिले नाही म्हणून ते एकाकी तोंडाशी पडले. आणि भाजपचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया नारायण पाटील यांनी दिली.

\