प्रतिनिधी ,नंदुरबार : आज सकाळी धड़गाव तालुक्यातील तोरणमाळ- खडकी रस्त्यावर जीप दरीत कोसळून 6 जणाचा जागीच मृत्यू झाला आणि 25 च्या वर नागरिक जखमी झाले. जखमींना धड़गाव ग्रामीण रुग्णालय व जिल्ह्यारुग्णालय येथे भरती करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली .दरम्यान जखमींना व मृत पावलेल्या नागरिकांच्या परिवाराला आवश्यक ती मदत करण्यात येईल तसेच सरकार तर्फे निधी देण्यात येईल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी देखील निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान ही घटना भीषण घटना असून भविष्यात अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येतील .त्या संदर्भात अधिकाऱ्यांना तश्या सूचना देण्यात येतील असे पालक मंत्री के सी पाडवी यांनी सांगितले,…
