प्रतिनिधी, नंदुरबार : जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार दौऱयावर असलेल्या अप्पर पोलीस महासंचालकांच्या उपस्थितीमध्ये विनय कारगांवकर चोरीस गेलेले ९ लाख ५५ हजार किमतीचे 100 मोबाईल तक्रारदारांना परत करण्यात आले आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात दाखल असलेले मालमत्तेविरुध्द्चे गंभीर गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातीलहस्तगत मुद्देमालापैकी 86,23,135/- रुपये किमंतीचा 24 गुन्ह्यातील मुद्देमाल देखील तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. यावेळी पोलीस दलाने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरात शंभराहुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीसांसाठी वाचनालयाचे उदघाटन देखील अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले.
