प्रतिनिधी , अमरावती : बर्ड फ्लूच्या भीतीने पोल्ट्री व्यवसाय बुडाला आहे तर खवय्यानी चिकन कडे पाठ फिरवली असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे अमरावतीत पोल्ट्री फॉर्म व्यवसायिकांनी चिकन महोत्सवाचे आयोजन केले होते यात महिला व बालकल्याण मत्री यशोमती ठाकूर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत बर्ड फ्लू विषयी अफवा पसरवून नका नाही तर अफवा पसरन्यावर गुन्हे दाखल होतील तर शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करतात त्यामुळे यावर कोणत्याही अफवाला बळी पडू नका विश्वास ठेवा तर अमरावतीत आतापर्यंत बर्ड फ्लू पॉझिटीव्ह अद्याप नाही त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले तर यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधीनी चिकन खात या विषयावर जनजागृती केली
