प्रतिनिधी ,अमरावती : अमरावतीमध्ये वर्षभरानंतर नाट्य पडदा उघडला, ‘लेखकाचा कुत्रा’ या एकांकिकेचे पी.के.एम.ने केले सादरीकरण अमरावती – गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे बंद असलेल्या नाट्य स्पर्धेंचा पडदा अखेर उघडला असून अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा, अमरावती आणि महानगरपालिका यांच्यावतीने अमरावती येथील टाऊन हॉल येथे आयोजित एकांकिका स्पर्धेत चांदूर रेल्वेच्या पीपल्स कला मंचाच्या वतीने ‘लेखकाचा कुत्रा’ या दमदार एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले.
नाट्य लेखनाकडून मालिका लेखनाकडे वळलेल्या लेखक पैशासाठी आपले नीती मूल्य सोडून कसा लिहायला लागतो आणि त्याला परत रंगभूमीकडे परत आणण्यासाठी त्याच्या शिष्याची धडपड यातील द्वंद्व या एकांकिकेत पाहायला मिळते. एकांकिकेचे लेखन विशाल कदम यांचे असून यात विवेक राऊत, अनुज ठाकरे आणि मंगेश उल्हे यांनी भूमिका साकारल्या.
