जनतेज न्युज

अमरावती शहर भयमुक्त करू- भाजप नेते अनिल बोंड यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी , अमरावती : अमरावतीत नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने 53 वर्षीय उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आलेली होती,त्यामुळे कोल्हे यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहे,तर आज भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील राजकमल चौकात मृतक उमेश कोल्हे यांना सार्वजनिक श्रद्धांजली देण्यात आली, यावेळी अमरावती शहरातील राजकमल परिसरातील दुकाने पूर्णपणे कडकडीत बंद होती,मात्र या श्रद्धांजली कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरीही हा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी भाजप नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी माध्यमांची संवाद साधला यावेळी गेल्या अनेक दिवसापासून अमरावती शहरात अशांतता असून अमरावतीत भय निर्माण झाले आहे त्यामुळे शहर लवकरच भयमुक्त करु असा विश्वास अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.