प्रतिनिधी , नागपुर : अयोध्या येथील राम मंदिर निर्माणासाठी नागपुरच्या वर्धारोड स्थित साई मंदिर संस्थेच्या वतीने 25 लक्ष रुपयांचा निधी
अयोध्या येथील राम मंदिर निर्माणासाठी संपूर्ण भारतात निधी संकलनाचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघा कडून केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरच्या वर्धारोड स्थित साई मंदिर संस्थेच्या वतीने 25 लक्ष रुपयांचा निधी संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांना साई मंदिर सेवा मंडळचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांच्या हस्ते देण्यात आले. भैयाजी जोशी यांनी, नागपुर साई मंदिरात जाऊन हा निधी स्वीकारला. याबाबत ओमप्रकाश यादव (साई सेवा मंडळ नागपुर) यांनी माहिती दिली.
