प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या शेवाळी- दातर्ती याठिकाणी मंगेश बाविस्कर नावाचा व्यक्ती स्पिरिट्स व आणखी घातक रसायन मिश्रित करून अवैधरित्या बनावट दारू तयार करत असल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास गुप्त माहिती दाराकडून मिळाल्यानंतर, धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी बुधवंत यांनी तात्काळ यासंदर्भात पथक तयार करून माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता, संबंधित व्यक्ती आपल्या दोन साथीदारांसह बनावट दारू तयार करीत असताना पोलिसांना आढळून आला.
या कारवाईमध्ये संशयित असलेल्या तिघा जणांच्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 64 हजार पेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान ताब्यात घेतला एका संशयिताच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई ची संपूर्ण माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
