जनतेज न्युज

अवैध नळ कनेक्शनवर कारवाई करणार – मुख्याधिकारी नितीन नार्वेकर.

प्रतिनिधी , जालना : जुन्या आणि नवीन दोन्हीही पाईपलाईनमधून अवैध नळ कनेक्शन घेणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.,शहरातील नागरिकांकडे कोट्यावधी रुपयांची नळपट्टी थकल्यानं पालिका कडक पाऊल उचलणार असून अवैध नळ कनेक्शन वर कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करणार असल्याचं देखील मुख्याधिकार्यांनी म्हटलं आहे.या आठवड्यात पथक स्थापन करण्यासाठी आदेश निर्गमित करणार असल्याची माहिती देखील मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली आहे.