जनतेज न्युज

अ‍ॅसिड टाकून जाळलेल्या तरुणीची अखेर मृत्यू..!

प्रतिनिधी , बीड : अ‍ॅसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झालाय.या घटनेने बीड जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली असून , माणुसकीला काळिमा फासलाय. 22 वर्षीय सावित्रा दिंगाबर अंकुलवार या तरुणीला,तिचा प्रियकर असणाऱ्या ,अविनाश राजुरे याने ऍसिड व पेट्रोल टाकून , जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी आरोपी प्रियकराने अर्धवट जळालेल्या अवस्थेत सावित्राला खदाणीमध्ये टाकून पळ काढला.त्यानंतर तब्बल 12 तास एकाच जागेवर , मदतीसाठी आर्त हाक मारणाऱ्या सावित्राला, नेकनूर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.मात्र मृत्यूशी झुंज देतांना उपचारादरम्यान अखेर तिचा मृत्यू झालाय.

पुण्यामध्ये लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहणारं हे जोडपं , आपल्या गावी नांदेडकडे परतताना , आरोपी अविनाशने हा धक्कादायक प्रकार घडवून आणलाय. या प्रकरणी आरोपींच्या शोधासाठी बीडमधून दोन पोलिसांचे पथक रवाना झाले असून याप्रकरणी नेकनुर पोलिस ठाण्यामध्ये आरोपी प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.अशी माहिती पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी दिलीय.तर संबंधित आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी.अशी मागणी पीडितेच्या वडीलांसह नातेवाईकांना केली आहे.