प्रतिनिधी, औरंगाबाद : पाच मे रोजी औरंगाबाद शहरातील सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली की आठ मे रोजी भानुदास सभाग्रह येथे विकास प्रकाश यांच्यावतीने डॉक्टर भगवान कापसे यांचा आंबा लागवड ते निर्यात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असून सदरील कार्यक्रम भानुदास सभागृहात होणार आहे.फळांचा राजा आंबा या पिकावर ती त्यांनी सखोलपणे संशोधन केले असून आंब्याच्या लागवडीपासून तर निर्यात इप्रद याची परिपूर्ण माहिती एका पुस्तकाच्या माध्यमातून फळबागेसाठी कामात येणार असून या पुस्तकाचे विमोचन आठ मे रोजी करण्यात येणार आहे.सदरील कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, यांच्या हस्ते सदरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती आज रोजी पत्रकार परिषद मध्ये देण्यात आले असून सदरील पत्रकार परिषद आज रोजी संपन्न झाली आहे,
सदरील पुस्तकास संदर्भात माहिती देताना डॉक्टर भगवान कापसे यांनी आंब्याच्या झाडांबद्दल सखोलपणे माहिती दिली असून सदरील कार्यक्रम आठ मे रोजी होणार असल्याची माहिती त्यांनी आज रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे.
