प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये हापूस आंब्याची आवक झालेली आहे मात्र यावर खूप कमी प्रमाणात आंबा आल्याने आंब्याचे भाव गगनाला भिडणारे आहेत सर्वसामान्यांना न परवडणारे असे हापूस आंब्याची एक पेटी पंधराशे रुपये ते साडेचार हजार रुपयांपर्यंत विकली जाते येत्या चार तारखेला रमजान महिना सुरू होणार असून त्यावेळी आंब्याची आवक वाढणार असल्याचे यावेळी व्यापारी सांगतात मात्र तरीही बाजारभाव मध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणारा आंबा कमी प्रमाणात येत असल्याचे यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले
