प्रतिनिधी , अमरावती : आजपासून राज्यातील बहुतांश भागातील शाळांना सुरुवात झालेली आहे..यासाठी शाळा देखील सज्ज झाल्यात.. शाळेतील शिक्षकांची कोविड तपासणी देखील आटोपली..शाळा निर्जंतुकीकरण सुद्धा करण्यात आल्यात..शाळा सुरू होताना मात्र पालकांना आपल्या पाल्यासाठी एक संमतीपत्र दयावे लागणार आहे..त्यामुळे पालक संभ्रमात आहेत..आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचं की नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे..याला अपवाद ठरलीय ती म्हणजे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात वसलेली मंगरूळ दस्तगिर येथील चंद्रभागाबाई पकोडे विद्यालय ..
शाळा सुरू होताहेत याचा आनंद विद्यार्थाना आहे..या शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थांनी शाळेत यायला सुरुवात केली..विशेष म्हणजे पालकांमध्ये सुद्धा उत्साह या ठिकाणी दिसतोय..शिक्षक देखील विद्यार्थ्यांची खबरदारी घेत आहे..शिक्षकांचं विद्यार्थ्यांवर असलेलं प्रेम या ठिकाणी दिसतंय. गेली ८ महिने शाळा बंद असल्याने विध्यार्थी देखील कंटाळले होते..मात्र आता शाळा सुरू होताच स्वतः आपल्या पालकांसोबत विध्यार्थी दाखल झालेत..अगदी प्रफुल्लित वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे..
