जनतेज न्युज

आदिवासी कुटुंबांना वाचवा; चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी , पुणे : जव्हार तालुक्यातील कडव्याचीमाळ येथे आदिवासी महिलेने उपासमारी व गरीबीला कंटाळून २ वर्षीय मुलीसह गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या पतीला मृतदेह रुग्णालयात नेण्यासाठी हजार रुपयांचं कर्ज घ्यावे लागले होते.
आणि याच मुद्द्यावरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्र वाघ यांनी ट्विट करून आदिवासी कुटुंबाना वाचवण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना केली आहे. जव्हार मध्ये कडव्याचीमाळ ला आदिवासी महिलेने उपासमारी व गरीबीला कंटाळून २ वर्षीय मुलीसह गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या नवऱ्याला यांना हॉस्पिटलला न्यायला १०००/- रू.कर्ज घ्यावं लागलं याहून वाईट स्थिती काय? @CMOMaharashtra ना विनंती अधिक वेळ वाया न घालवतां आदिवासी कुटुंबांना वाचवा, अशी विनंती चित्रा वाघ यांनी केली आहे.