प्रतिनिधी , मुंबई : आम्ही जर एखादा विषय घेतला तर आम्ही देशद्रोही आहोत आमची पाकिस्तानशी हातमिळवणी आहे असं म्हंटल जातंय. आणीबाणीत हेच सुरू होतं ना इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा काँग्रेसवाले म्हणत होते की आंदोलन करणारे विरोधक हे देशद्रोही आहे. आज तुम्ही देखील तेच म्हणत आहे. तुमच्याच मनात आणीबाणी आहे. तुम्हीच मागच्या दाराने देशात आणीबाणी आणण्याचा प्रयत्न करत आहात.
या देशातील शेतकरी हा जागृत शेतकरी आहे. हा पंजाब हरियाणाचा शेतकरी तुम्हाला मदत करतो तुम्हाला निवडून आणतो. तुमची सरकारे स्थापन करतो त्यावेळी तो कोणत्या भ्रमात नसतो त्यावेळी तो तुमचा असतो. जेव्हा तो त्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा तुम्ही त्याला भ्रम निर्माण करतोय अस म्हणताय. हा डबल स्टॅण्डर्ड आहे.
महाराष्ट्र सरकार आरक्षण संदर्भात न्याय निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. कायद्याच्या चौकटीत राहून घटनेच्या चौकटीत राहून समाजातील प्रत्येक घटकाला कोणावरही अन्याय होणार नाही त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी थोडी आपली मानसिकता बदलायला हवी. अनेकवेळा स्थगिती देणं, स्थगीति न उठवन यामागे काही वेगळी भूमिका आहे का हे आम्हांला समजून घ्यायच आहे.
