जनतेज न्युज

आरपीआय आठवले गटाची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी, रायगड : अलीबाग थळ येथील राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्समध्ये (आरसीएफ) झालेल्या भीषण स्फोटासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाने पालकमंत्री उदय सामंत, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलीय. १९ ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता आरसीएफ कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकाचा मुंबई येथे रुग्णालयात ‘उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच अन्य दोघांवर उपचार सुरु आहेत. सदर कंपनीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने आणि पुरेशी सुरक्षितता न पुरवल्याने हा भयानक प्रकार ओढवला असून कामे कंपनीने आवश्यक ती सुरक्षितता पुरविण्यात आली नव्हती. तसेच प्रकार यापूर्वी ही अनेकदा झाले घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या दुर्घटनेत अजूनही कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही किंवा त्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली नाही. तरी कंपनीच्या संबंधीत अधिकारी आणि कंपनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रिपाई अलीबाग तालुका अध्यक्ष सुनिल सप्रे यांनी केली. तसेच मृतांच्या कुटुंबियांना नोकरी मिळावी, अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सहसचिव जयप्रकाश पवार, अलिबाग विभाग अध्यक्ष अध्यक्ष सुनिल सप्रे, आघाडी प्रमुख नेहा गायकवाड़, अॅड. मनमित पाटील, सरचिटणीस संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.