प्रतिनिधी, बुलढाणा : आवाज बंद.. तुम्ही झोपा काढत होतात का ?, मी बोलत आहे, तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोलले का ? , म्हणत भाजप आमदार श्वेता महालेनी भर बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना खडसावले. त्यामुळे काही काळ सभागृहात शांतता पसरली होती .. बुलडाणा जिल्ह्यात कृषी केंद्र चालकांकडून खतांचे लिंकिंग होत आहे .. त्यामुळे शेतकरी ऐन पेरणीच्या दिवसात अडचणीत सापडला आहे.त्यामुळे आमदार श्वेता महाले यांनी चिखली मतदार संघातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी, कृषी कंपन्या चे प्रतिनिधी सोबत एक बैठक आयोजित केली होती.. बैठकीत आमदार महाले यांनी खतांची लिंकिंग न करण्याच्या सूचना केल्या आणि जर असे झाले तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी सुद्धा कृषी विभागाकडे केली आहे.मात्र बैठक सुरू असताना आमदार महाले यांनी भर बैठकीत जिल्हा परिषद च्या कृषी अधिकारी अनिसा महाबळे याना चांगलेच झापले आमदार महाले ह्या कृषी अधिकाऱ्यांना दुकानदार कसे लिंकिंग करतात याचा पुरावा दाखवत असतानाच कृषी अधिकारी अनीसा महाबळे ह्या मधेच बोलायला लागल्या असता , आवाज बंद.. तुम्ही झोपा काढत होतात का? , म्हणत चांगलेच झापले .. आणि कृषी अधिकाऱ्यांना शांत केले आहे. यावेळी सभागृह मात्र स्थब्द झाले होते. मात्र आमदार महाले यांनी भर सभागृहात अधिकाऱ्यांना झापल्याने इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे. , एव्हढे मात्र निश्चित.
