जनतेज न्युज

इंदू मिलच्या धर्तीवर तडवळ्यात लवकरच छोट स्मारक होणार – संजय बनसोडे

प्रतिनिधी, उस्मानाबाद :उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा ही ऐतिहासीक भुमी असुन डॉ बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे . डॉ बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी मंजुर आहे मात्र जागेअभावी काम रखडले आहे . बाबासाहेबांचा पाईक म्हणुन मी स्वतः तडवळ्यात उपलब्ध सरकारी जागा मिळवण्यासाठी गृहमंत्री , पणन मंत्री , सामाजिक न्याय मंत्री यांची भेट घेऊन यातुन १ माहिन्याच्या आत मार्ग काढत मंबई येथील इंदू मिल येथे होत असलेल्या अंतराष्ट्रीय स्मारकाच्या धर्तीवर तडवळ्यात छोटे स्मारक करण्याचा प्रामाणीक प्रयत्न करील असे मत राज्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे उस्मानाबाद संपर्क मंत्री संजय बनसोडे यांनी सांगीतले .