जनतेज न्युज

इंधन दरवाढ व विजबिल माफीच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन

प्रतिनिधी , उस्मानाबाद : इंधन व गॅस दरात झालेली भरमसाठ दरवाढ तसेच लॉक डाऊन काळातील संपुर्ण विजबिल माफ या जनहित मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत आहेत . उस्मानाबादमध्ये जिल्हाध्यक्ष अॅड तानाजी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले . मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अॅड चौधरी यांनी दिला . यावेळी सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .