जनतेज न्युज

इडा पिडा टळु दे बळीच राज्य येऊ दे महाविकास आघाडीचे सरकार जाऊ दे,रयत क्रांती संघटना

प्रतिनिधी, बुलडाणा : राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात रयत क्रांती संघटना व पक्षाच्या वतीने बळीराजाला साकडे घालण्यात येत आहे..त्यानिमित्त मेहकर तालुक्यातील राजगड शिवारात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जितू अडेलकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे खरीप हंगाम सुरू झाला असुन बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करत आहेत अशातच बोगस बियाणे व वाढीव दराने खताची विक्री होत आहे कांदा पिकाचे भाव पडले कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे सोयाबीन तूर कापूसाचे भाव पडलेले आहेत अशात सरकारकडून कोणतीही मदत शेतकऱ्यांना देण्यात आली नाही शेतीपंपाची वीज तोडण्यात पाप हे सरकार करत आहे. मेहकर तालुका रयत क्रांती संघटनेच्यावतीने महाविकास आघाडी सरकार चा निषेध करण्यात आला.