प्रतिनिधी , मुंबई : जे कोणी भाजप विरोधात बोलतात त्यांच्यावर ईडीमार्फत भाजपकडून कारवाई करण्यात येत हे जगजाहीर आहे.मात्र, आतापर्यंत अनेक नेत्यांवर तिकडून नोटीस पाठवण्यात आल्या. त्या नोटीसीनंतर समोर काय झालं यासंदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ईडीची चौकशी हे संशयित असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
