प्रतिनिधी , सोलापूर : काल रात्रभर उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपले आहे
उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या महिन्यातभरात अधून – मधून पाऊस दमदार बरसला आहे.
यामुळे कांदा ,सोयाबीन, उडीद, मका, तुर पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस आता मात्र,खरीप पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे.
यामुळे शेतकऱ्यांत मोठे चिंतेचे वातावरण आहे.
कांदा ,उडीद ,सोयाबीन, मुग ,मका ,भाजीपाला पाण्यातच सडून जात आहे.
यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील रानमसले ,वडाळा, नान्नज, पडसाळी, कळमण, गावडी दारफळ , वांगी , शेजारील खुनेश्वर , मोरवंची यापरिसरात अशीच अवस्था झाली आहे. सध्या रानमसले परिसरात शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून ओढे, नाले ,विहीरी तुडुंब भरुन वाहत आहेत.
कौठाळी- कळमण रोडावरील पुलावर पाणी आल्याने कौठाळी गावचा संपर्क तुटला आहे.
तसेच रानमसले – खुनेश्वर , रानमसले -पडसाळी, रानमसले – वांगी रस्त्यावर वांगिरा आणि डोहिरा ओढा दुथडी भरुन वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.
गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
धान्य, संसारोपयोगी साहित्य भिजले आहे.
याबाबत महसुल विभागाकडून घरांचे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
