प्रतिनिधी , पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषेदवर राज्यपाल नियुक्त म्हणून आमदार होण्यास भाजपाचा आक्षेप नाही. पण त्यांनी यापूर्वीच विधान परिषद निवडणूक का लढवली नाही? हे सगळंया घडीला का, असे प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहेत. ठाकरे यांच्या नियुक्तीला राज्यपाल अद्याप नियुक्ती देत नसल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाने शिवसेना ही राज्यपालांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला. पाटील यांनी भाजपचा विरोध नाही, असे स्पष्ट केले तरी याबाबत आता आणखी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सीएम फंडाऐवजी पंतप्रधान फंडाला मदत करत असल्याचे विचारले असता आम्ही आम्ही काय पाकिस्तान पंतप्रधानांच्या फंडात पैसे भरायला सांगत नाहीत, असा खुलासा त्यांनी त्यावर केला. उलट केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक मदत मिळाल्याचा दावा त्यांनी केला. पुण्यातील कोरोनाच्या संकटाबाबत पाटील म्हणाले की, पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांनी काय केल आहे आणि काय केलं पाहिजे यावर त्यांना आमच्या सूचना दिल्या. पुण्यातील काही वॉर्डांतील परिस्थिती गंभीर आहे. होम गार्ड, एसआरपीएफ यांना लोक घाबरतात,याबाबत पोलीस आयुक्तांनी निर्णय घ्यावा. पुण्यात काही ठिकाणी वॉर्डात भिलवाडा पॅटर्न राबवता येईल का याचीही चर्चा झाली. अशा ठिकाणच्या लोकांना १० दिवसाच रेशन देऊन त्यांना घरातच थांबवून ठेवता येईल का, अशी सूचना त्यांनी केली.
