जनतेज न्युज

उद्धव ठाकरे साहेब कार चालवतात,सरकार चालवतात त्यासाठी फडणवीसांच्या सर्टिफिकेटची गरज नाही- अंबादास दानवे

प्रतिनिधी, सोलापूर : देवेंद्र फडणवीसांनी संभाजीनगर आणि जालना मध्ये पाण्याच्या प्रश्नावरून मोर्चा काढला.
-मी सध्या सोलापुरात आहे. सोलापुरात भाजपचे दोन खासदार आहेत, आमदार आहेत, मंत्री देखील राहिले आहेत, तरी देखील सोलापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

  • सोलापुरात नऊ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो, त्यामूळे फडणवीसांनी सोलापुरात देखील मोर्चा काढायला हवा.
  • जालनामध्ये रावसाहेब दानवे 20 वर्षांपासून नेतृत्व करतात, बबनराव लोणीकर हे पाणी पुरवठा खात्याचे मंत्री होते.
  • जर पाण्याच्या प्रश्नावर मोर्चा काढायचा होता तर दानवे यांनी वीस वर्षात काय केले, लोणीकर पाणीपुरवठा मंत्री असताना त्यांनी काय केलं?
  • सत्ता असताना देवेंद्र फडणवीसांनी पाणी प्रश्नावर मोर्चा का नाही काढला?, त्यामुळे मला वाटतं की आजच्या सरकारला दोष देण्याची गरज नाही.
  • विरोधी पक्षनेत्यांनी उद्विग्नेतून हे वक्तव्य केले आहे
  • उद्धव ठाकरे कार, सरकार आणि सर्वकाही चालवतात
  • कोरोना काळात सर्वात चांगले काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव होते, आहे
  • त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब हे कार चालवतात, सरकार चालवतात त्यासाठी फडणवीसांच्या सर्टिफिकेटची गरज नाही