प्रतिनिधी : आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस आणि याच वाढदिवसा निमित्त संगमनेर मधे शिवसैनिकांकडुन तमाशा कलावंतांना 51 हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.तमाशा कलावंताचे लॉकडाऊनच्या कालावधीत झालेले हाल.अवघ्या महाराष्ट्राने पाहीले याचच भान शिवसैनिकांनी ठेवत संगमनेर मधे ही मदत केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त संगमनेरच्या शिवसैनिकांनी कोनतीही कोनतीही बँनरबाजी न करता आज तमाशा कलावंताना रघुवर खेडकर यांच्याकडे फुलन फुलाची पाकळी म्हनुन 51 हजार रूपयांचा धनादेश सोपवला आहे.खेडकर कुठुंबीयांना काही दिवसांपुर्वी कोरोनाचे घेरले होते यात काही कुटुंबीयाचा मुत्यु देखील झाला होता.आता याच कुठुबीयांच्या मदतीला शिवसैनिक धावुन जात आर्थीक मदत केली आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख नानासाहेब खेवरे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संगमनेर तालुका प्रमुख जनाभाऊ आहेर, तालुका युवा सेना प्रमुख गुलाब राजे भोसले ,गणेश धात्रक, रंगनाथ फटांगरे ,अक्षय ,संदीप राणे ,श्याम राणे आदी शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
