प्रतिनिधी, धुळे : दोन दिवसाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी एक पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपरीय विधान केल्याप्रकरणी धुळे शहरात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अनिल गोटे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली संबोधने योग्यच आहे. तशी वेळ पडल्यास मी न्यायालयासमोर ही सिद्ध करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी बोलताना सांगितले की, मी लिहिलेल्या पत्रातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली संबोधने योग्य असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध करेल, विशेष म्हणजे माझे साक्षीदार उपमुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ अमृता फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रावसाहेब दानवे, आमदार जयकुमार रावल हे राहतील. तसेच या चालून आलेल्या संधीचे मी सोने करेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या अभिनंदन पत्रातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली होती. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी विविध शब्द वापरले होते, त्यांच्या पत्राला भारतीय जनता युवा मोर्चाच्या एका तरुण कार्यकर्त्याने उत्तर दिल्यानंतर अनिल गोटे यांच्या विरोधात धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर अनिल गोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा काल लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांना मी बहाल केलेली विशेषणे किती रास्त होते हे न्यायालयासमोर सिद्ध करण्याच्या चालून आलेल्या संधीचे मी सोने केल्या वाचून राहणार नाही. यावेळी अनिल गोटे यांनी बोलताना सांगितले की, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा तसेच न्यायालयात माझ्या बाजूने कोणतेही वकील राहणार नसून मी स्वतः ही केस लढणार असल्याची माहिती अनिल गोटे यांनी दिली आहे. अनिल गोटे यांच्या या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे.
