जनतेज न्युज

उपयुक्तांना शिव्या देणाऱ्या उपमहापौरांविरोधात सर्वपक्षीय कामगारांचे आंदोलन,उपमहापौरपद बरखास्त करण्याची मागणी

प्रतिनिधी , सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेत आज कामगारांनी उपमहापौर भाजपचे राजेश काळेंच्या विरोधात जोरदार आंदोलन केले, दोन दिवसांपूर्वी उपमहापौर राजेश काळे यांनी उपायुक्त धनराज पांडे यांना किरकोळ कारणावरून धमकावले होते. तसेच अर्वाच्य भाषा वापरत गलिच्छ अशा शिव्या दिल्या होत्या, सदरील कॉल रेकॉर्डिंग वायरल झाल्यानंतर विविध स्तरांतून उपमहापौर राजेश काळे यांचा निषेध व्यक्त करण्यात येत होता. तर उपायुक्त धनराज पांडे यांनी काळे विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. आज उपयुक्त धनराज पांडे यांच्या समर्थनार्थ आणि उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात सर्वपक्षीय कामगारांनी महापालिकेत आंदोलन केले. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात कामगार तसेच सामान्य नागरिकांचीही उपस्थिती होती.