जनतेज न्युज

उस्मानाबादेत भाजपा व मित्रपक्ष वगळता सर्वपक्षीयांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने.

प्रतिनिधी , उस्मानाबाद : शेतकरी कायद्याविरोधात आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला उस्मानाबाद मध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. शहरातील सर्व दुकाने कडकडीत बंद असून शाळा महाविद्यालय तसेच एसटी महामंडळाची वाहतूक सुरळीत सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,शेतकरी कामगार पक्ष या राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी उस्मानाबाद शहरात फिरून बंद पाळण्याचे आवाहन केले. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री जीवनराव गोरे ,काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमानी शेतकरी कामगार पक्षाचे भाई धनंजय उद्धवराव पाटील यांच्यासह भाजपा वगळता सर्वपक्षीय राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्र सरकारचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला.