जनतेज न्युज

एकनाथ खडसे यांची कोथळी ग्रामपंचायतीवर सत्ता

प्रतिनिधि , जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोथळी हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे गाव आहे. त्यात 5 जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत, तर उर्वरित 6 जागांवर राष्ट्रवादी व भाजप समर्थक असलेले उमेदवार निवडून आलेले आहेत. शिवसेना पुरकृत 5 उमेदवारांच्या विरोधात निवडून आलेले 6 उमेदवार हे आपले समर्थक असल्याचा दावा एकनाथ खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांनी केला आहे. या ठिकाणी दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्याने सरपंच नेमका कोणत्या गटाचा असेल, याबाबत उत्सुकता आहे.