प्रतिनिधी , यवतमाळ : लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याने एक लाख नऊ हजार वाहन चालकां कडुन दोन कोटी28 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वाहतूक शाखेने मोहीम राबविली होती. यात मास्क न वापरणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, हेल्मेट विना प्रवास, अशा प्रकारे विविध वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. पुढेही मोहीम सुरू राहील आणि कारवाई केली जाईल,अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी दिली.
