प्रतिनिधी , यवतमाळ : शहरात सुरू असलेल्या ऑनलाइन क्रिकेट जुगारावर पोलिसांची धाड टाकून चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख तीन लाख18 हजार रुपयांसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ऑस्ट्रेलिया येथे बिग बैश क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धे दरम्यान यवतमाळ शहरात ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महिला अत्याचार कक्ष व सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. जुगार खेळणारे आणि खेळविणाऱ्यांना अटक करण्यात आली. इतरही सूत्र धारांचा शोध पोलिस घेत आहेत. जुगार खेळण्यासाठी मशीन कुठे बनविली, त्यांची लिंक कुठ पर्यंत जुळली, याचा उलगडा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
