प्रतिनिधी , पुणे : राज्य मागासवर्गीय आयोगाने पुण्यात झालेल्या माघील बैठकीत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. आजही आयोगाची पुण्यात बैठक पार पडतेय. मात्र, राज्यातील निवडणूका कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असतांना इम्पेरिकल डेटा गोळा होईल याची शक्यता फारशी नाहीय. हा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली नाहीये. त्यासाठी लागणारा निधी आणि स्टाफचं न दिल्यानं ओबीसी नेते आक्रमक झाले आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाहीतर निवडणूका होऊ देणार नाही, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.
