प्रतिनिधी , धुळे : ओबीसी समाज हा नेहमीच मराठा आरक्षणाला सपोर्ट करत असतांना, काही लोकांकडून दोन समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा लढा वेगळ्या दिशेने जोतोय कि काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण टिकविण्यासाठी ओबीसी समाज आज धुळे शहरात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने धुळे शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जेल रोड पर्यंत ओबीसी आरक्षण बाचाओ च्या जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला यावेळी सुनील नेरकर यांनी बोलताना सांगितले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या वतीने केंद्रातील असो की, राज्यातील कुठल्याच मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, आणि ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
