प्रथिनिधी, नाशिक :
पिंपळगाव बसवंत मधील ओला कचरा पासून बायोगॅस प्रकल्पाद्वारे बायोगॅस तयार करून 15 केव्हीच जनसेट चालवून विद्युत निर्मिती होऊन सदर प्रकल्प या विद्युत वर चालवला जात असून पिंपळगाव बसवंत येथील अमरधाम,सांडपाणी प्रकल्प, गावातील लाइट्स, या वीज निर्मितीवर चालत आहे. यामुळे गावातील होणारा कचऱ्याला देखील आळा बसला आहे.
पिंपळगाव बसवंत येथे डम्पिंग ग्राउंड वर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता हा कचरा परिसरातील नदी तसेच द्राक्ष बागांमध्ये जात असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास येथील नागरिकांना सहन करण्याची वेळ येत होती. त्यामुळे पिंपळगाव ग्रामपंचायतीने बायोगॅस प्रकल्प सुरू करून यामध्ये या प्रकल्पाद्वारे ओल्या कचऱ्यापासून 3 ते 4 टन गॅस तयार होऊन जनसेट चालू करून वीजनिर्मिती होत असल्याने ग्रामपंचायतीचा 25 ते 30 हजार रुपये फायदा होत होत आहे. अमरधाम तसेच सांडपाणी प्रकल्प ,गावातील स्ट्रीट लाईट अशा अनेक गोष्टी या वीज निर्मिती पासून चालत असल्याने यामुळे ग्रामपंचायतीला फायदा होत आहे. डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाणारा कचरा हा या प्रकल्पात वापरला जात असल्याने परिसरातील नागरिकांना कचऱ्यापासून सुटकारा मिळाला आहे.
