जनतेज न्युज

कपाशीवरील पांढऱ्या डागांची शेतकऱ्यांत धास्ती… कृषि विभागाने मार्गदर्शन करण्याची शेतकरीची मागणी..

जळगाव, प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यासह बऱ्याच तालुक्यात पडलेल्या पावसाच्या शिडकाव्यानंतर कपाशीच्या पिकावर दिसलेल्या
पांढऱ्या थर व आवरनामुळे शेतकरी वर्गात धास्तीचे वातावरण पसरले असून शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पाऊस पडल्याने शेतकरी आनंदीत होते. यापाऊसामुळे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरीनी शेतातील कपाशी पिकांचे पाहणी केली असता त्यांना आचानक या कपाशीवरील पानावर विशिष्ट असे पांढऱ्या रंगाची डागांची पडलेल्या पानावर दिसुन आले आहे. त्यामुळे या प्रकारा बाबतीत मात्र शेतकऱ्यांना चांगलीच धास्ती घेतली आहे. तरी याबाबत कृषी तज्ज्ञांनी शेतकरीवर्गाला योग्य ते मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे