प्रतिनिधी, सोलापूर : करमाळा शहरातील जयप्रकाश नारायण टाऊन हॉल परिसरात आज दुपारी आग लागली. यामध्ये नगरपालिकेचे बंद असलेले फिरते स्वच्छतागृह जळून खाक झाले. ही आग वीजवण्यासाठी तेथील नागरिकांनी प्रयत्न केले. नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आग आटोक्यात आणली. आगीत जळून खाक झालेले फिरते स्वच्छतागृह हे बंद पडलेले होते. त्यामुळे यात मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. यात कोणीतरी खोडसाळपणा करून ही आग लावली असल्याची चर्चा आहे.आग लागल्यानंतर आगीचे मोठे लोट दिसत होते. आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच नगरपालिकेचे व्यापारी गाळे होते. आग आटोक्यात आली नसती तर धोका निर्माण झाला असता. येथील अण्णा थोरात, गॅरेजवाले शिंदे, साळुंखे आदींनी आग वीजवण्यासाठी प्रयत्न केला. जवळ असलेल्या एका झाडाला हाय लागली आहे.
