प्रतिनिधी, नाशिक : कर्नाटक येथील शिमोगा शहरात हर्ष नागराज झिंगाडे (भावसार) या तरुणांची क्रूर हत्या करण्यात आली होती.या हत्येच्या निषेधार्थ येवला भावसार समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तरुणाची हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मोर्चामध्ये महिला देखील समावेश घेत तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हत्या करणार्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
