जनतेज न्युज

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफ्तात अत्याधुनिक सामुग्रीने सज्ज आपत्कालीन वाहन

प्रतिनिधी, कल्याण : शहरात इमारत कोसळण्याच्या घटना घडल्यास कमीत कमी कालावधीत मलबा हटवून खाली गाडल्या गेलेल्या लोकांची सुखरूप सुटका करणे महत्वाचे असते मात्र अनेकदा अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक सामुर्गी नसल्याने जेसीबीच्या मदतीने मलबा उपसताना मलब्याखाली गाडल्या गेलेल्या नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता असते. त्याच बरोबर पावसाळ्यात पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकाची सुटका करण्यासाठी लागणारी उपकरणे, प्रदूषित वायुमुळे घुस्मटलेल्या नागरिकांना तत्काळ लागणारा ऑक्सिजन मास्क,१ मजल्यापर्यत लागलेल्या आगीवर नियत्रण मिळविण्यासाठीची उपकरणे, अत्याधुनिक मोल्डिंग शिडी, हेल्मेट, पावसाळ्यात पडलेली झाडे तोडण्याची उपकरणे यासह कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीशी सामना करणारी अग्निशामक दलाची गाडी आवश्यक असते अशाप्रकारे अत्याधुनिक सामुग्रीने सज्ज आपत्कालीन गाडी  राज्य शासनाने महापालिका प्रशासनाला धाडली आहे.आज हि गाडी कल्याण डोंबिवली पालिकेच्या वाहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली  असून वाहन विभागाने अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत या वाहनाचा ताबा घेतला. दरम्यान या वाहनाचे लवकरच लोकार्पण करत हे वाहन शहरातील आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे यामुळे अनेक वर्षापासून पारंपारिक उपकरणाच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीशी लढणाऱ्या अग्निशमन विभागाला मदतीचा मोठा हात मिळाल्याचे समाधान अग्निशमन विभागाच्या कर्मचार्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.