जनतेज न्युज

कळसुबाई शिखर सर करून दिव्यांगांनी साजरे केले नवीन वर्ष

दिव्यांगाचे नववर्ष कळसुबाई शिखरावर

प्रतिनिधी ,शिवर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम
महाराष्ट्रातील दिव्यांगांना एकत्र करून दरवर्षी 31 डिसेंबर रोज सर्वोच्च कळसुबाई शिखरवर घेवून जाण्याचा उपक्रम शिवर्जा प्रतिष्ठान मार्फत राबविला जातो. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजी गाडे स्वतः पोलियोग्रस्त दिव्यांग असून ते वर्षभर अशा सहाशि गडदुर्ग भटकंतीचे आयोजन करत असतात,
कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखर असून या शिखरावर जाण्याची आवड, स्वप्न प्रत्येक दिव्यांगाचे असते परंतु लागणारा वेळ, सुरक्षितत व येणारा मोठा खर्च पाहता दिव्यांग कळसुबाई शिखरवर जाण्याचे स्वप्न पूर्ण करु शकत नाही, या दिव्यांगाच्या ऊर्जा इच्छा शक्तीला शिवुर्जा प्रतिष्ठान तर्फे गेल्या 9 वर्षा पासुन नियमित प्रेरणा देण्याचे कार्य करत सुरु आहे. या अनोख्या मोहिमेसाठी आपल्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून दिव्यांग बांधव सहभागी झाले होते, यापुर्वी 8 वेळोन कळसुबाई शिखरावर दिव्यांगाच्या ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील या राबविलेल्या मोहिम अंतर्गत महाराष्ट्रातील 102 दिव्यांगांनी सर्वोच्च कळसुबाई शिखर सर केले आहे. यावर्षी देखील 31 डिसेंबर 2020 रोजी राज्यातील 70 दिव्यांगांनी एकत्र येत कळसुबाई शिखर सर केले,
महाराष्ट्र भरातील सहभागी सर्व दिव्यांग कळसुबाई पायथ्याशी जहाँगीरदारवाडी या गावात विविध मार्गाने व साधनाने श्री मच्छिंद्र खाडे या दिव्यांग व्यत्तीच्या घरी एकत्र आले. 31 डिसेंबर रोजी दुपारी 2.00 वाजता कळसूबाई शिखर चढाईला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की, जय व हर हर महादेव व कळसुबाई माते की जय अशा घोषणा देत हे सर्व दिव्यांग स्त्री व पुरुष एकमेकांना आधार देत रात्री 7.00 वा. पर्यंत कळसुबाई शिखर माथा गाठला. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत व सोसाट्याच्या वाऱ्यात तंबूमध्ये मुकाम ठोकुन 01 जानेवारी 2021 रोजी पहाटे कळसुबाई मातेचे दर्शन घेतले. यानंतर नवीन वर्षाच्या नव उगवत्या सूर्याचे दर्शन घेणून नविन वर्षाचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. सकाळी ठिक 10.00 वाजता शिखर उतरण्यास सुरुवात करण्यात आली आणि अवघ्या तीन तासात दुपारी 1.00 वाजता पायथ्या वरील जहांगीरदारवाडी गाव गाठले या दिव्यांग शिखर ऊर्जा मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यातील सर्व प्रकारचे दिव्यांग सहभागी झाले होते, सहभागी सर्व दिव्यांगांना प्रतिष्ठानतर्फ कळसुबाई शिखर सर केल्या बद्दल प्रमाणपत्र पदक प्रदान करण्यात आले,
यावेळी पायथ्याजवळ नाशिक प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संतोष मानकर यांच्या उपस्थितीत सर्व सहभागी सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित इगतपुरी तालुका कार्याध्यक्ष विलास कानकट, इगतपुरी शहराध्यक्ष योगेश चव्हाण, इगतपुरी शहर संघटक अनिल शिंदे, विष्णू माळी, खुशी मानकर, रोहन मानकर उपस्थित होते.